जपानची राजकन्या सामान्य नागरिकाशी करणार विवाह

टोकियो  :जपानच्या राजकन्या अयाको या केई मोरिया या सामान्य नागरिकासोबत यंदा विवाह करणार आहेत. केई एका शिपिंग कंपनीत काम करतो. जपानच्या कायद्यानुसार राजकन्येने सर्वसामान्य नागरिकासोबत विवाह केल्यास तिला शाही दर्जा गमवावा लागतो. तर राजकुमारांनी सामान्य युवतीशी विवाह केल्यास त्यांचा दर्जा मात्र कायम राहतो.

राजकन्येला शाही दर्जा गमवावा लागण्याची जपानमधील ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अयाको यांची चुलत बहिण राजकन्या माको यांनी महाविद्यालयीन मित्र कोमुरो याच्यासोबत साखरपुडा केला होता. परिवारातून बाहेर पडणार राजकन्या अयाको या टोकियोच्या मेइजी जिंगु मंदिरात 29 ऑक्टोबर रोजी विवाह करणार आहेत. या विवाहामुळे त्यांना राजघराण्याची साथ सोडावी लागेल. परंतु राजघराणे त्यांना 10 लाख डॉलर्स (सुमारे 6 कोटी 85 लाख रुपये) इतका लाभांश देणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अयाको यांनी समाजकल्याण विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवले आहे. केई आणि अयाको दोघांनाही जागतिक कल्याण, स्कीइंग, वाचन आणि भटंकतीची आवड आहे. दरम्यान, वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे जपानचे राजा अकीहितो पुढील वर्षी निवृत्त होण्याची योजना आखत आहेत. मे 2019 मध्ये राजपुत्र नारुहितो जपानचे पुढील राजा होणार आहेत. जपानमध्ये देवानंतर राजाला दर्जा दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)