“जन्मोजन्मी हाच पती मिळु दे’

आळंदी- मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत बुधवारी (दि.27) अलंकापुरीत वटपौर्णिमा साजरी केली. “जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करून त्यांनी जुन्या नव्याचा मेळ साधला. वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी दिवसभर सुवासिनींची पूजेचे साहित्य, वडाची रोपे, फांद्या, फळे, काळी पोत, कापसाच्या वाती, वस्त्रे, सूतगुंडी, करंडाफणी, बांगड्या, वस्त्र, फुले आदींच्या खरेदीची लगबग पहायला मिळाली. दिवसभर महिलांनी वडपूजा करीत, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. पूजा सांगण्यासाठी एकाचवेळी अनेक ठिकाणचे निमंत्रण असल्याने पुरोहितांची धांदल उडाल्याचेही चित्र होते. नुकताच विवाह झालेल्या नववधूंची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने त्यांच्यात उत्साह होता. हातावरीची मेहंदी,भरजरी साड्या, नक्षीदार कंगण अशा वेशभूषा केलेल्या नववधू लक्षवेधी ठरल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)