जन्मापासूनच त्यांच्या नशिबी “स्ट्रीट चिल्ड्रन’चे जगणे

सर्व्हेक्षणातून बाब समोर : बाळाला शांत ठेवण्यासाठी अफूचा वापर

पुणे – पुणे महापालिका आणि “रेनबो फाउंडेशन’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून शहरात 10 हजार 427 “स्ट्रीट चिल्ड्रन’ संख्या समोर आली आहे. यात आणखी एक बाब धक्कादायक आहे. भीक मागणे किंवा रस्त्यांवर वस्तू विक्रीसाठी वापर करण्यात येणाऱ्या सर्वाधिक मुलांचा वयोगट हा चार ते सहा वर्षे आहे. एवढेच नव्हे तर दहा दिवसांच्या बाळापासून ते अठरा वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांचाही यात समावेश आहे.

-Ads-

या मुलांचा वापर जन्मापासून केला जातो. म्हणजे गरोदर असणारी स्त्री तिच्या अगतिकता दाखवत सिग्नलला भीक मागताना दिसते. जन्मल्यानंतरही झोळीत टाकून या मुलांच्या आधारे भीक मागितली जाते. हा वापर तीन प्रकारे केला जातो. त्यामध्ये तीन ते चार वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांची आई किंवा मोठी बहीण कडेवर किंवा झोळीत घेऊन भीक मागते. अशावेळी काही वेळा बाळाला शांत ठेवण्यासाठी अफूसारखे पदार्थ टाळूला चिकटवले जातात. त्यामुळे बाळ गुंगीत राहाते आणि त्याचा त्रास भीक मागताना होत नाही. दुसऱ्या प्रकारात नुकताच चालणाऱ्या लहान मुलांचा वापर केला जातो. या मुलांना त्यांचे पालक बळजबरीने भीक मागण्यासाठी पाठवतात. मात्र, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटून भीक मिळावी यासाठी त्यांची हाताची बोटे चिकटवणे, त्यांचे चेहरे रंगवणे असे प्रयोग केले जातात. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. तिसऱ्या प्रकारात मोठ्या मुलांचा समावेश असतो. ही मुले रस्त्यावर वस्तू विकून किंवा पडेल ती मजुरी करून दिवसाला सरासरी दीडशे रुपये कमावतात.

डेक्‍कन परिसरात जवळपास 30 ते 40 कुटुंबे पुलाखाली किंवा दुकाने बंद झाली की त्याच्या कट्ट्यावर पथारी पसरतात. केवळ सणासुदीला किंवा धार्मिक कार्यक्रमांना गावी जाणारी ही कुटुंबे कर्नाटक होऊन आलेली आहेत. येथील मुले फुगे, खेळणी विक्रीचे काम करतात. सहा ते सात तांस काम केल्यावर सुमारे दोनशे ते तीनशे रुपये कमावतात. पारधी समाजाची संख्या यामध्ये जास्त आहे. कात्रज येथील याच समाजातील काही मुले लिंबू-मिरची विकण्याचे काम शनिवारी करतात. त्यातून त्यांना एका दिवसात 700 ते 800 रुपये मिळतात.

 

समन्वयक – नितीन साके, पंकज कांबळे (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)