जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या

नवी दिल्ली : आईनेच ८ महिन्यांच्या बाळाची गळा चिरुन हत्या केली, तर त्याच्या शरीरावर अनेक वारही केले आणि त्यानंतर स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. दिल्लीतील अमन विहार भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आईचे नाव सारीका असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहे. तिने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कबुली दिलेली नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. सारीकाची मानसिक अवस्था चांगली नाही. तिला रूग्णालयात आणले गेले तेव्हा तिने प्रचंड गदारोळ घातला आणि मग ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेली. त्यामुळे तिच्या बाळाला तिनेच ठार केले हे ठामपणे सांगताही येत नाही आणि ठामपणे नाकारताही येत नाही असे पोलीस अधिकारी तिवारी यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)