जनावरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

जामखेड- वाहनांमधून बेकायदेशीर जनावरे घेऊन जात असताना जामखेड- खर्डा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या मदतीने टेम्पो पकडला. यावेळी सात जनावरे आढळून आली. या प्रकरणी टॅम्पो चालकाविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर जनावरे घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक (एमएच. 23 ए.यु 0206) खर्डा रस्त्यावरून जात असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून बटेवाडी शिवारातील मारुती मंदिराजवळ तो थांबवली. चालक इम्रान जब्बर कुरेशी (रा.मोमिनपुरा, बीड) यास विचारणा केली असता त्याच्याकडून संशयस्पद उत्तरे मिळाली. टेम्पोच्या मागच्या फळ्या काढल्या असता दाटीवाटीने 7 गोवंश गायी बांधल्या असल्याचे दिसले. या घटनेची माहिती कार्यकर्त्यांनी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालकासह टेम्पो ताब्यात घेतली.

टॅम्पो जामखेड पोलीस ठाण्याला आणला. टॅम्पो व जनावरे असा दोन लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यानंतर पोलीस कर्मचारी मुक्तार लतीफ कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इम्रान कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)