जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जिल्ह्यात घातला होता धुमाकुळ : तिघे जेरबंद; तिघे फरार
जळोची- जिल्ह्यातील जनावरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पोलिसांनी आज (शनिवारी) पर्दाफाश केला आहे. यातील तिघांना पोलिसांनी जेरबंद केला असून त्यांनी गुन्हाची कबूली दिली आहे. तर त्यांच्या इतर तीन साथीदारांचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सुपरेश ऊर्फ पप्पू भालसिंगे (वय 24, रा. दैंदे, ता. खेड), स्वप्निल बाळकृष्ण भालसिंगे (वय 20), सहादु बबन राऊत (वय 53, रा. हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर सुनिल मेमाणे, तानाजी ऊर्फ मल्या, ईश्वर, (पूर्ण नावे माहिती नाही) हे फरर असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. लोणकर वस्ती, जळगाव (ता. बारामती) येथील फिर्यादी महावीर अरंविद लोणकर यांच्या गोठ्यातील अंदाजे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या पाच जर्शी गायी चोरुन नेल्या होत्या. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शिक्रापूर पोलीस हद्दीतील पाबळ या गावात गायी चोरीचा गुन्हा करीत असताना नागरिक जागे झाल्याने आरोपींनी पळ काढला मात्र, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो (एमएच 12 एफसी 6349) बाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर हा टेम्पो लोणी काळभोर येथील मोहन काळभोर यांच्या नावे असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, टेम्पो थेऊर येथून चोरीस गेल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधिक्षक यांचे गुन्हे शोध पथकातील गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन घडलेल्या घटनेच्या माहिती बरोबरच त्यांच्याकडील गोपनीय माहितीच्या आधारे कऱ्हावागज जवळील लोणकर वस्ती (ता. बारामती) येथील सुपरेश ऊर्फ पप्पू भालसिंगे व त्यांच्या साथीदारांनी चोरल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार कारवाई करीत त्याच्यासह स्वप्निल व सहादूला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता सासवड, जेजुरी, शिक्रापूर, लोणी काळभोर, बारामती आदी भागातून अनेक गायी चोरुन नगर जिल्ह्यात नेल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी नगर गाठून त्याठिकाणाहून 12 गायी हस्तगत करुन बारामती पोलीस ठाण्यात आणल्या.

ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्ष संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, बारामती उपविभागीस पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस नाईक संदीप जाधव, स्वप्निल आहिवळे, रॉंकी देवकाते, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, अनिल खेडेकर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)