जनावरांमध्ये झपाट्याने पसरतोय बुळकांडी रोग

बुळकांडी रोगाची लक्षणे
बुळकांडी हा रोग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुकर आदी प्राण्यांत मुख्यत्वे आढळतो. या रोगाचे विषाणू मुख्यत्वे तोंडातील लाळ, डोळ्यांतून व नाकातून येणारे स्राव, जनावरांचे मल-मूत्र यांमध्ये आढळतात. विषाणू प्राथमिक अवस्थेत शरीरातील रक्‍तप्रवाहाबरोबर वाहत असतात. सर्वसाधारणपणे विषाणूंचा प्रसार दूषित खाद्य व पाण्याद्वारे होतो. शरीराचे तापमान वाढत जाते. डोळे लालसर होऊन त्यातून सतत पाणी येते, जनावरांच्या तोंडाचा वास येणे, चिकट रक्‍ताळलेले अतिसार अशी लक्षणे दिसून येतात.

निरगुडसर, बेलसरवाडीतील प्राण्यांना लागण झाल्याचे निष्पन्न

मंचर -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथील परिसरात 16 गोठ्यांतील 37 जनावरांना बुळकांडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पुणे येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 30) गोठ्यांना भेट देऊन जनावरांचे रक्‍त आणि शेणांचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.
निरगुडसर गावातील वळसेमळा, बेलसरवाडी परिसरातील 30 जर्शी गाई, 5 कालवडी, 2 म्हशींना बुळकांडी रोगाची लागण झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही जनावरांना बुळकांडी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ लागला. स्थानिक पशुवैद्यकीय विभागाने प्रतिबंधक उपाय करूनही जनावरांना आराम पडत नाही. यामुळे ही बाब पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्‍त कांतीलाल उमाप यांच्या निदर्शनास पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांनी आणून दिली. त्यानुसार सहायक पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. प्रमोद वराडे, औंध विभागीय रोग निदान प्रयोगशाळेचे डॉ. एच. एन. पाटील, निरगुडसर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. शेरखाने, डॉ.अतुल साबळे, डॉ. सुरेश टाव्हरे, सरपंच उर्मिला वळसेपाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांनी भेट देऊन गोठ्यातील जनावरांची पाहणी केली.तसेच रक्‍त आणि शेणाचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील औंध येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)