जनावरांच्या लाभासाठी अडीच लाख अर्ज

संग्रहित फोटो

पुणे जिल्ह्यातून 4 हजार 911 अर्ज : सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यातून

पुणे – पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ संकरीत गायी, शेळी गट आणि मांसल कुक्कुट पालनासाठी राज्य शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातून 2 लाख 35 हजार 911 अर्ज आले असून, सर्वाधिक अर्ज बुलढाणा जिल्ह्यातून आले आहेत. तर पुणे जिल्ह्यातून 4 हजार 911 अर्ज आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

-Ads-

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जनावरांचा लाभ सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, आदिवासी या प्रवर्गातील व्यक्तीला देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 15 ते 29 नोव्हेंबर दरम्यान, ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या योजनेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 26 हजार 593 अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ जालना येथून 19 हजार 567, औरंगाबाद येथून 17 हजार 909 अर्ज आले आहेत. या अर्जांतून लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार असून, ज्या लाभार्थ्याची निवड होईल त्याला अर्जावर दिलेल्या मोबाईल क्रमांवर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातून 4 हजार 911 अर्जदारांनी अर्ज केले असून, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. तर सर्वांत कमी सिंधूदुर्ग येथून केवळ 369 अर्ज आले आहेत.

लाभार्थ्यांना सर्व लाभ
जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सर्व लाभ देण्यात येणार असून, त्यामध्ये ठाणबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी शेळ्या, मेंढ्या व बोकड देण्यात येणार आहे. तसेच एक हजार मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करण्यास अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% अनुदानावर शेळी गट आणि मांसल पक्षी पोल्ट्री शेड बांधकाम करण्यासाठी 1 लाख 12 हजार 500 तर विशेष घटक प्रवर्गाकरीता 1 लाख 68 हजार 750 एवढे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये 30 टक्‍के महिला आणि 3 टक्‍के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)