जनावरांच्या प्रदर्शनात धामणीचे वळू ठरले विजेते, उपविजेते

अकोले: राजूर (ता. अकोले) येथील सुधारित देशी व डांगी जनावरांच्या प्रदर्शनात इगतपुरी (जि. नाशिक) तालुक्‍यातील धामणी येथील अंकुश गोरख भोसले यांचा वळू विजेता (चॅम्पियन) ठरला, तर धामणी येथीलच रतन रामदास भोसले यांचा वळू उपविजेता ठरला आहे.

मागील 60 वर्षांपासून डांगी जनावरांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी राजूर येथे सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. आ. वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले. यावेळी आ. वैभवराव पिचड, सरपंच हेमलताताई पिचड, उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, तहसीलदार मुकेश कांबळे, पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ, माजी जि. प. अध्यक्ष देवराम लांडे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, जि. प. सदस्य रमेश देशमुख, गिरजाजी जाधव, गोरख मालुंजकर, राजेंद्र कानकाटे, विजय भांगरे, विजय लहामगे, अरुण माळवे, काशिनाथ भडांगे, अभिजित नवाळी, पुष्पा निगळे, सारिका वालझाडे, संगीता पवार, विठ्ठल बांगर, सुरेश गडाख, शेखर वालझाडे, दीपक देशमुख, दौलत देशमुख, नीलेश साकुरे, चंद्रकांत वराडे, काळू मोहंडुळे, दत्तात्रय भोईर, बाळासाहेब आंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्य विजेचे वळू ः आदत- अंकुश भोसले (प्रथम क्रमांक, इगतपुरी), दोन दाती- दत्तू कारभारी ढोन्नर (प्रथम, समशेरपूर), चार दाती : किसन बारकू भोईर (प्रथम क्रमांक, सिन्नर), सहा दाती: रतन भोसले (प्रथम क्रमांक, इगतपुरी), आठ दाती- अशोक सखाराम बेंडकोळी (प्रथम क्रमांक, कोकणे वाडी). याच वेळी बैल जोड्यांमध्येही पहिले क्रमांक काढले गेले. त्यात जालिंदर म्हतू धुमाळ (शेरणखेल), दादा पाटील बाबुराव गोडसे (मोग्रेस) यांच्या गायींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)