जनावरांची अवैध वाहतूक पकडली

शिरवळ, दि 24 (वार्ताहर) – शिरवळ, ता. खंडाळा येथे पंढरपूर फाट्याजवळ कत्तलीसाठी तीन वाहनांतून जनावरे नेत असल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी ती ताब्यात घेतली. पंढरपूर फाट्यावील जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला.
पंढरपूर फाट्याजवळ झेंडेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे येथील दिपक गोरगल यांना तीन वाहनांमधून गायी व बैलांची वाहतूक करण्यात येत असल्याचा संशय आल्याने त्यांनी वाहने थांबवून पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी गाय, बैल, खोंड असे 21 जनावरे व वाहने मिळून 6 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्याद दिपक गोरगल यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार हे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)