जनार्दन रेड्डी यांना लाचखोरीच्या आरोपात अटक 

file photo

बेंगळूरु – कर्नाटकातील खाण उद्योजक आणि भाजप नेते गली जनार्दन रेड्डी यांना आणि त्यांच्या सहकाऱ्याला आज लाचखोरीच्या आरोपात अटक करण्यात आली. त्यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेड्डी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. तसेच काही साक्षीदारांनीही त्यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. त्याच्या आधारे रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे, असे बेंगळूरु पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्रांचचे सहआयुक्‍त आलोक कुमार यांनी सांगितले.

पॉन्झी स्कीममधील एक आरोपी सय्यद अहमद फरीदकडून लाच स्वीकारल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे. फरीद याच्या
अंबिदान्त मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून तब्बल 15 हजार जणांची 600 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. रेड्डी यांना 18 कोटी रुपयांचे 57 किलो सोने आपण लाच म्हणून दिले असल्याचे फरीदने त्याच्या जबाबामध्ये सांगितले आहे. पॉन्झी स्कीमप्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाकडून केल्या जात असलेल्या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी ही लाच दिली गेली असल्याचेही फरीदने सांगितले.

-Ads-

तीन दिवस फरार असलेले रेड्डी काल पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यानंतर सेंट्रल क्राईम ब्रांचच्यावतीने रेड्डी यांची काल दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 2.30 वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा चौकशीला सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांनी रेड्डी यांना अटक केली.

रेड्डी यांचा स्वीय सहायक अली खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रेड्डी यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी सोमवारी होणार आहे. मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीसाठी भाजपने रेड्डी यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र रेड्डी यांनी त्यांच्या दोघा भावांसाठी जोरदार प्रचार केला होता. रेड्डी यांचे सहकारी सिरीमेल्लू यांनी बेळ्ळारी विधानसभेची जागा जिंकली आहे. त्यासाठी त्यांनी बेळ्ळारी येथील खासदारकीचा राजीनामा दिला होता. अलिकडेच झालेल्या बेळ्ळारीच्या पोटनिवडणूकीमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)