जनसेवा बॅंकेतर्फे सभासदांना 10% लाभांश 

एकूण व्यवसाय 3052 कोटींवर; ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविणार 
पुणे: जनसेवा सहकारी बॅंक हडपसर, पुणे ची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 18 ऑगस्ट रोजी पुणे विद्यार्थीगृहाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड टेक्‍नोलॉजीचे मुक्‍तांगण सभागृह, पर्वती, पुणे येथे संपन्न झाली. बॅंकेचे अध्यक्ष सीए. प्रदीप जगताप यांनी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना बॅंकेच्या वतीने व सभासदांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावर्षी बॅंक सभासदांना 10% लाभांश देत असल्याचे अध्यक्ष सीए. प्रदीप जगताप यांनी जाहीर केले. बॅंकेस सातत्याने अ वर्ग लाभलेला असून सन 2017-18 च्या झालेल्या वैधानिक लेखा परीक्षणात बॅंकेला अ वर्ग मिळालेला आहे. दि. 31 मार्च 2018 अखेर बॅंकेच्या ठेवी 1796 कोटी व कर्जे रुपये 1256 कोटी इतके आहेत. बॅंकेचा एकूण व्यवसाय 3052 कोटी आहे.
बॅंकिंग क्षेत्रात सध्याच्या स्पर्धेत विचार करता बॅंकेने चांगली प्रगती केली आहे. पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड नागरी सहकारी बॅंकेमध्ये जनसेवा बॅंकेने सातत्याने पहिला क्रमांक राखला आहे. बॅंकेची स्वत:ची एकूण 22 एटीएम असून रूपे कार्ड द्वारे बॅंकेच्या ग्राहकांना अन्य बॅंकांच्या जवळपास 8,25,000 पेक्षा अधिक एटीएमद्वारे व्यवहार करता येतात. बॅंकेच्या डेबिट कार्ड मार्फत 10 लाखांहून अधिक ठिकाणी खरेदीची सेवा उपलब्ध आहे. बॅंकेने मोबाइल बॅंकिंग सेवा, तसेच मिस्ड कॉल अलर्ट फॉर बॅलन्स, इकॉम, ग्रीन पीन, इन्स्टा कार्ड इत्यादी सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
यूपीआय, मोबाइल बॅंकिंग विथ बिल पेमेंट इम्प्लिमेंटेशनचे कामकाज या वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने बॅंक प्रयत्नशील असून या सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष सीए. प्रदीप जगताप यांनी सांगितले.
तसेच नेहमी खातेदारांना बॅंकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असते. बॅंकेने दिलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधामुळे बॅंकेच्या उलाढालीत वाढ होत असल्याचे
दिसून येते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)