जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

घोरपडी – घोरपडी, मुंढवा आणि कोरेगाव पार्क येथील गणेश मंडळाकरिता जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये परिसरातील शेकडो गणेश मंडळ सहभागी होतात. यंदा 142 गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मंडळाचे परीक्षण सुरु करण्यात आले आहे. घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील मंडळानी विविध देखावे बनवले आहेत. अनेक मंडळानी सामाजिक संदेशपर देखावे बनवले असून त्यामध्ये “बेटी बचाव आणि झाडे लावा, झाडे वाचवा’ तसेच स्वच्छता मोहीम यावर भर दिला आहे. अनेक मंडळानी भव्य-दिव्य मंडप टाकून विद्युतरोषणाई केली आहे. गणेशोत्सव स्पर्धेमध्ये गणपतीची सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती, विद्युत रोषणाई व सजावट, हलता देखावा, जनजागृती जनसेवा देखावा, उत्कृष्ट ढोलताशा पथक, आदर्श मंडळ अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार मंडळानी विद्युतरोषणाईला प्राधान्य दिले आहे. काही प्रमाणात हालता देखावा अन्य देखावेही मंडळांनी बनवले आहेत. विजेता मंडळाला 17 सप्टेंबरला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)