जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेटफळगढे- महसोबाची वाडी (ता. इंदापूर) येथील जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हसोबाची वाडी येथील जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धेत 160 मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे – मुले : केतन चांदगुडे, अनिकेत पवार, सूरज कुंभरकर. मुली : रिंकू चांदगुडे, निकिता खंडाळे, ऋतूजा खंडाळे.
चमचा लिंबू स्पर्धेत 170 मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे – मुले : ज्ञानेश्वर चांदगुडे, अनिकेत मोहिते, सूरज कुंभरकर. मुली : दिशा पवार, साक्षी सूर्यवंशी, नेहा मोहिते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रमोद चांदगुडे, अध्यक्ष प्रशांत चांदगुडे, गणेश सूर्यवंशी, मुकंदर मुलाणी, सलमान मुलाणी, हरिश्चंद्र साळुंके, विजय मोरे, दीपक चांदगुडे, विशाल तावरे, यशवंत उंबरकर, मनोज उंबरकर, सचिन चांदगुडे, हिम्मत जाधव, भूषण चांदगुडे, संतोष चांदगुडे, हेमंत चांदगुडे, विकास मळेकर, वैभव कवडे, युवराज तावरे, प्रशांत राऊत, सौरभ चांदगुडे, अनिकेत पवार किशोर तावरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)