जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी – महापुरुषांची आठवण निवडणुकांपुरतीच मर्यादित राहिली आहे की काय असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना महिला दिनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत घडली असल्याचा आरोप करत या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी आयुक्‍तांकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाला महिला दिनानिमित्त माता जिजाऊंच्या कार्याचा विसर पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निमंत्रण पत्रिकेवर माता जिजाऊ यांचे फोटो न लावताच निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या.

या कार्यास जबाबदार जनसंपर्क विभागातील अधिकारी अण्णा बोदडे व रमेश भोसले असून पालिकेकडून त्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. त्या जनसंपर्क अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)