जनसंघर्षवरून संगमनेरामध्ये विद्यार्थी संघटनेत वाद

सभेला उपस्थित राहण्याची सक्‍ती अभविपचा आरोप : एनएसयुआयकडून खंडन
संगमनेर – कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा संगमनेर तालुक्‍यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इशान गणपुले यांनी सोशल माध्यमाद्वारे केला. मात्र, असे काहीही झाले नसून विद्यार्थी स्वयंस्फूतीर्ने कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचे एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा म्हणाले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका वर्गाच्या व्हॉटस्‌अप समुहावर एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची नियोजित पुर्वपरीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना बिना गणवेश आणि ओळखपत्र एका राजकीय पक्षाच्या सभेत सहभागी व्हायच्या सुचना देतो. म्हणजे शैक्षणिक वेळापत्रकात राजकारणासाठी ढवळाढवळ करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात आल्याचा असा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणपुले यांनी सोशल माध्यमाद्वारे केला.
याबाबत पापडेजा म्हणाले, जनसंघर्ष यात्रा ही सामाजातील सर्व घटकांसाठी आहे. तशीच ती विद्यार्थ्यांसाठीही आहे. तालुक्‍यातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी एनएसयुआयच्या वतीने आव्हान करण्यात आले होते. अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना सक्ती केली हा खोडसळपणा आहे. एक प्रकारे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विद्यार्थी हिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतलेला नाही. आणि आता ते विद्यार्थी प्रेमाचा खोटा आव आणत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)