“जनमंगल”तर्फे दीपावली शुभेच्छा मेळावा

आळेफाटा- आळेफाटा ( ता.जुन्नर) येथे जनमंगल पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दीपावली शुभेच्छापर मेळाव्यास सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन वाळूंज आणि व्यावस्थापक विजय काळे यांनी दिली. दशरथ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच शशिकांत लाड, हभप राजाराम महाराज जाधव, लक्ष्मण शेळके, सुरेश वाणी, सुरेश भुजबळ, अभिषेक वामन, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास देवकर, सचिव संतोष चौगुले, संचालक दिलीप देवकर, ओंकर सोनवणे, मारुती नरवडे, बाळासाहेब चौगुले, महादेव शिंदे, विलास काशिकेदार, विलास देवकर, सुरेखा कसार, शितल पिंगट, संचालक डॉ. महादेव वाणी, नबाजी देवकर, रवींद्र डोके, अनुराधा गडगे, शकुंतला वाळुंज, मुरलीधर भोर, जितेंद्र भंडलकर, संकेत नवले, शिवाजी डोके, विलास वाव्हळ, संकेत बढे, पुष्पलता पोटे, पुष्पावती गाढवे, हीरा क्षीरसागर संस्थेचे सल्लागार, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन वाळूंज यांनी प्रास्तविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला हभप राजाराम महाराज जाधव, दशरथ शेवाळे, लक्ष्मण शेळके यांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन संतोष चौगुले, तर आभार प्रदर्शन डॉ. महादेव वाणी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)