नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री जनधन योजना यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. बॅंक खाते उघडण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशातून ऑगस्ट 2014 मध्ये चार वर्षांसाठी जनधन योजनेची अंमलबजावणी झाली. या योजनेंतर्गत आता आणखी सवलती उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यानुसार जनधन खातेधारकासाठी ओव्हरड्राफ्टची सुविधा दुप्पट करून 10 हजार रूपये इतकी करण्यात आली आहे.

तसेच 28 ऑगस्टनंतर जनधन खाते उघडणाऱ्यांसाठी मोफत अपघात विमा कव्हर दुप्पट म्हणजे 2 लाख रूपये इतके करण्यात आले आहे. जनधन योजनेंतर्गत आतापर्यंत 32 कोटी 41 लाख खाती उघडण्यात आली. त्या खात्यांमध्ये मिळून 81 हजार 200 कोटी रूपये जमा आहेत. जनधन खातेधारकांपैकी 53 टक्के महिला आहेत. तर एकूण 83 टक्के खाती आधारशी जोडण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)