जनधन खात्यातील ठेवी वाढल्या

नवी दिल्ली – सरकारने सर्वसमावेशक विकासासाठी जनधन खाते उघडण्याची योजना सुरू केली होती. आता या खात्यातील रक्‍कम 80 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्या असल्याचे सांगितले जाते. मार्च 2017 नंतर या खात्यातील ठेवीत वाढ होत आहे. सरकारने नोटाबंदी जारी केल्यानंतर अशा प्रकारची खाती मोठ्या प्रमाणात उघडण्यात आली होती. जागतिक बॅंकेने भारतातील ही योजना यशस्वी झाली असल्याचे सांगितले आहे.

सर्वसामान्य लोकांना बॅंकांतून कर्ज घेता यावे. तसेच त्यांना या खात्याच्या माध्यमातून सरकारला अनुदान देता येणे शक्‍य व्हावे याकरता सरकारने ही योजना सुरू केली होती. जागतिक पातळीवर या योजनेची वाखाणणी झाली आहे. अगोदर या खातेधारकांची संख्या केवळ 25 कोटी इतकी होती. आता या खातेधारकांची संख्या 31 कोटींवर गेली आहे. अगोदर अशा खात्यात साधारणपणे 480 रुपये असायचे. आता या खात्यातील रक्कम साधारणपणे 1096 रुपयांपर्यंत वाढली आहे.

-Ads-

2011 मध्ये देशातील 35 टक्‍के लोकांची बॅंकांत खाती होती. 2014 मध्ये हे प्रमाण वाढून 53 टक्‍के झाले. आता हे प्रमाण 80 टक्‍क्‍यांवर गेले आहे. यात महिलांनी उघडलेल्या खात्याचे प्रमाण जास्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)