जनतेला आधी हजारों जखमा दिल्या आता बॅंडेज लावले ; कॉंग्रेसचे भाजपवर टीकास्त्र

इंधन दरांमधील कपात अत्यल्प 
नवी दिल्ली: मोदी सरकारने इंधन दरांमध्ये केलेली कपात अत्यल्प आहे. आधी सरकारने जनतेला हजारों जखमा दिल्या. आता त्यावर बॅंडेज लावले, असे टीकास्त्र कॉंग्रेसकडून सोडण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून उचलण्यात आलेल्या पाऊलावर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी जहाल प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रचंड उत्पादन शुल्क लादले. भाजपशासित राज्यांमधील सरकारांनी इंधनांवर मोठा मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला. त्यातून तब्बल 13 लाख कोटी रूपयांची इंधन लूट करण्यात आली. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांत स्पष्ट पराभव दिसू लागल्याने आणि जनतेच्या संतापाचा सामना करावा लागत असल्याने मोदी सरकारने घबराटीपोटी प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. देशातील जनतेला मूर्ख बनवू शकत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानात घ्यावे. जनतेला उत्तर देण्याचे आव्हान आम्ही मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना देतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
मोदी सरकारने 12 वेळा इंधनांवरील उत्पादन शुल्कात वाढ केली. त्यामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 211 टक्के तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 443 टक्के वाढ झाली. कॉंग्रेसला केंद्राची सत्ता सोडावी लागली तेव्हा मे 2014 मध्ये पेट्रोलवर केवळ 9.23 रूपये उत्पादन शुल्क आकारले जात होते. मोदी सरकारने ते 19.48 रूपये केले. डिझेलवर 2014 मध्ये फक्त 3.46 रूपये उत्पादन शुल्क होते. ते आता 15.33 रूपये असल्याकडे सुर्जेवाला यांनी लक्ष वेधले. मोदी सरकार 29 देशांना स्वस्तात इंधन का विकते, असा सवाल करत त्यांनी इंधन दर 2014 या वर्षाच्या पातळीवर आणावेत आणि पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे, या कॉंग्रेसच्या मागण्यांचा पुनरूच्चार केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)