जनतेने इतर खर्च कमी करावा! राजस्थानच्या मंत्र्याचा ‘अजब’ सल्ला

जयपूर: वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजपच्या अनेक तोंडाळ नेत्यांमध्ये आता राजस्थानचे एक मंत्री राजकुमार रिणवा यांचीही भर पडली आहे. इंधन दरवाढीमुळे पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी जनतेने इतर खर्च कमी करावा, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.

विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदच्या दिवशीच रिणवा यांना जनतेला सल्ला देण्याची लहर आली. इंधनाचे दर जर वाढत असतील; तर इतर खर्च कमी करावेत हे जनतेला सुचत नाही. वापर वाढल्याने दरवाढ होत असल्याचेही जनतेच्या ध्यानात येत नाही. इंधन दरांशी सरकारचा संबंध नाही. ते दर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहेत. पुरामुळे बसलेल्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी देशभरात हजारों कोटी रूपयांचा खर्च केला जात आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे.

करांमध्ये कपात करून इंधन दर कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजप मंत्र्याच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले. ते वक्तव्य मग्रूर आणि असंवेदनशील आहे. इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर अशा वक्तव्यांतून मीठ चोळले जात आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)