जनतेच्या बचतीतून वित्तीय तुटीवर नियंत्रणाचा प्रयत्न ?

नवी दिल्ली- राष्ट्रीय बचत योजनेतील तब्बल एक लाख कोटी रुपये वापरून सरकार पुढील वर्षी तूट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पुढील वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यात सरकारला केवळ 2.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार असल्याचे अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात पुढील पुर्ण वर्षात केंद्र सरकारने 6.05 लाख कोटी रुपये कर्ज घेण्याचे ठरविलेले आहे. नावीण्यपूर्ण उपाययोजना केल्याशिवाय तुटीवर लघुपल्ल्यात नियंत्रण मिळविता येणार नसल्यामुळे या शक्‍यतेवर विचार केला जात असल्याचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)