जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फडणवीस सरकार घाबरतं- जयंत पाटील 

जालना: निर्धार परिवर्तन यात्रा आज जालना येथील घनसावंगीला दाखल झाली. ‘परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे’ असा नारा देत या यात्रेने राज्य ढवळून काढलंय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर घणाघात केला.

प्रश्नांना उत्तरं द्यायला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार घाबरतं. त्यामुळेच विधिमंडळाचं अधिवेशन फक्त पाच दिवसांचं ठेवण्यात आले, अशी तोफ येथील सभेत जयंत पाटील यांनी डागली. स्व. अंकुश टोपेंनी या भागाला आईसारखे प्रेम दिले आणि राजेश टोपेसुद्धा त्याचप्रमाणे काम करत आहेत. नेता बनण्यासाठी तीस-तीस वर्षं जनतेची कामं करावी लागतात, असेही पाटील म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)