जनतेच्या नाही काँग्रेसच्या कृपेवर मी अवलंबून – कुमारस्वामी

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांकडे जनादेश मागितला होता. पण तो मिळाला नाही. त्यामुळे आज आपण काँग्रेसच्या कृपेने आहोत, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे.तसेच ‘माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांकडे जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही, असे स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मी अयशस्वी ठरलो. तर  जर मी मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझ्या पक्षाला बहुमत मिळाले नाही याचा अर्थ लोकांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारले आहे. मी पूर्ण बहुमत देण्याची मागणी केली होती. मी शेतकरी नेत्यांची वक्तव्यं ऐकली आणि त्यांनी मला किती पाठिंबा दिला हेही पाहिले. नेता म्हणून माझ्याही काही मर्यादा आहेत. तरीही शेतकरी कर्जमाफीबद्दलचे माझे धोरण स्पष्ट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माझी प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी व नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट आहे. सोमवारी सकाळी ते दिल्ली रवाना होतील. त्यानंतर दुपारी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)