नवी दिल्ली: इंधनाच्या वाढलेल्या भावांविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारतबंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर हजेरी लावली. याबाबत शरद पवार यांनी ट्विटरद्वारे आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना “केंद्र सरकारला ते जनतेची सेवा करण्यामध्ये पूर्णपणे निष्प्रभ झाले असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याने आपला बंदला पाठिंबा आहे.” असे ट्विट केले आहे. या ट्विट बरोबरच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करतानाच फोटो देखील ट्विट केला आहे.

दरम्यान भाजपाने इधंदरवाढी बाबत आपले हात झटकले असून भाजपानेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन “इंधनाचे दर कमी करणे हे सरकारच्या हातात नसून, आंतरराष्ट्रीय स्थरावरील परिस्थितीला अनुरूप इंधनाचे दर कमी-अधिक होत असतात” असे वक्तव्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)