जनता सहकारी बॅंकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्‌घाटन

एटीएम केंद्र कार्यान्वित, बॅंकेची 71 वी शाखा; अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध

पुणे -बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बॅंकिंगसेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्‌घाटन विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट समूहाचे अध्यक्ष भरतजी आगरवाल यांच्या हस्ते तर येथील एटीएम केंद्राचे उद्‌घाटन बॅंकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते बुधवार दि. 28 मार्च 2018 रोजी करण्यात आले. बॅंकेची ही 71 वी शाखा आहे.

उद्‌घाटनप्रसंगी बॅंकेचे संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, आदी मान्यवर ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी आज येथे दिली. जनता बॅंकेची बिबवेवाडी शाखा शॉप नं. 24 ते 27, रासकर पॅलेस, तळमजला, सीटीएस नं. 692, चिंतामणीनगर भाग 2 शेजारी, हॉटेल जयपूर गार्डन समोर, बिबवेवाडी, पुणे 411 037 येथे सुरू करण्यात आली असून या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यामध्ये इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एनिवेअर बॅंकिंग, एनईएफटी, आरटीजीएस विमा आदींचा समावेश आहे. या सेवा सुविधांचा या परिसरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी यावेळी केले. प्रमुख पाहुणे, मान्यवर खातेदार आणि हितचिंतकांचा याप्रसंगी बॅंकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री. जयंत काकतकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जगदीश कदम यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विनय दुनाखे यांनी सूत्रसंचालन केले. बिबवेवाडी शाखेचे शाखाव्यवस्थापक निलेश देशपांडे यांनी आभार मानले. जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या 71 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स) सुमारे रुपये 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)