जनता सहकारी बॅंकेची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

पुणे – जनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या संचालक मंडळाची सन 2017 ते 2022 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. एकूण 17 संचालक निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके (जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण) यांनी रविवार दिनांक 16 जुलै रोजी बॅंकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव व बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर उपस्थित होते.

जनता बॅंकेच्या दिनांक 31/12/2016 अखेरच्या सुमारे 1 लाख 60 हजार सभासदांमधून संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली. मल्टिस्टेट सोसायटी कायद्यानुसार बॅंकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक घेण्याची प्रक्रिया असल्याने आजच्या सभेत नवीन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. यानंतर होणाऱ्या पहिल्या संचालक मंडळ सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकात सर्वसाधारण मतदार संघात विद्यानंद देवधर, जगदीश कदम, डॉ. मधुरा कसबेकर, बिरू खोमणे, संजय लेले, सीए माधव माटे, सुनील मुतालिक, सीए सुधीर पंडित, प्रभाकर परांजपे, लक्ष्मण पवार, महेंद्र पवार, सीए मोहन फडके, किशोर शहा व अमित शिंदे यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघात रामदास शिंदे यांची निवड झाली आहे. महिला राखीव मतदार संघात ऍड. गौरी कुंभोजकर व अलका पेटकर यांची निवड झाली आहे.

सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या 69 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स2) सुमारे रुपये 13 हजार 900 कोटींपेक्षा अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)