जनता सहकारी बॅंकेची उपहारगृह कर्जयोजना सुरू

पुणे: सहकारी बॅंकिंग क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेने छोटे हॉटेल व्यावसायिक, बेकरी उत्पादक, अमृततुल्य, लंच होम, खानावळ चालक व केटरर्स आदींसाठी खास कर्ज योजना तयार केली आहे. या नव्या कर्जयोजनेचा शुभारंभ शुक्रवार दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आला. यावेळी तीन प्रातिनिधिक व्यावसायिकांना कर्ज मंजुरीची पत्रे प्रदान करण्यात आली. ही माहिती जनता बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी येथे दिली.

या शुभारंभाच्या कार्यक्रमाला पुणे रेस्टॉरंट हॉटेलरी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी व महाराष्ट्र राज्य केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीन हॉटेल व्यावसायिकांना कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाला बॅंकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जयंत काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते. जनता उपाहारगृह कर्ज योजनेविषयी माहिती सांगताना लेले म्हणाले की, ही कर्जयोजना विनातारणी व्यावसायिक कर्ज योजना असून या योजनेद्वारे किमान रुपये 50 हजार ते कमाल रुपये 5 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या कर्जाची मुदत 12 महिने राहणार असून व्यवसाय विस्तारासाठी हे कर्ज मुख्यत: दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड दैनंदिन, साप्ताहिक व मासिक स्वरूपात करायची आहे. या कर्जासाठी कोणतेही तारण घेतले जाणार नाही.
या कर्जयोजनेची सविस्तर माहिती बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या कर्ज योजनेचा हॉटेल व्यावसायिकांनी जरूर लाभ घ्यावा. हॉटेल व्यावसायिकांना ऐनवेळी खेळत्या भांडवलासाठी बराच पैसा लागतो. त्यांना या योजनेमुळे मदत होणार आहे. जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात 71 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स्‌) सुमारे रुपये 14 हजार 500 कोटींपेक्षा अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)