जनता बॅंकेच्या बोरिवली शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर

पुणे- बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बॅंकिंग सेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या बोरिवली (प.) शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर करण्यात आले. या नूतनीकृत शाखेचे उद्‌घाटन जनता सहकारी बॅंकेचे संचालक प्रभाकर परांजपे यांच्या हस्ते तर येथील एटीएम केंद्राचे उद्‌घाटन बॅंकेचे संचालक मोहन फडके यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्‌घाटनप्रसंगी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी दिली. जनता बॅंकेची बोरिवली पश्‍चिम शाखा प्लॉट नं. 18, सीटीएस 531-532, नंद-नंदन भवन, सोडावाला लेन, बोरिवली (प), मुंबई 400092 येथे स्थलांतरित करण्यात आली असून या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एनिवेअर बॅंकिंग, एनईएफटी, आरटीएस, विमा आदींचा समावेश आहे.

या सेवा सुविधांचा या परिसरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी यावेळी केले. मान्यवर खातेदार आणि हितचिंतकांचा याप्रसंगी बॅंकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या 70 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स) सुमारे रुपये 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)