जनजागृतीमुळे संसर्गजन्य आजार आटोक्‍यात

नारायणगाव-वारूळवाडीमध्ये माहिती, प्रबोधनाने केले काम

नारायणगाव- नारायणगाव आणि वारूळवाडी शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत नारायणगाव, ग्रामपंचायत वारूळवाडी, रोटरी क्‍लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने ससंर्गजन्य साथीच्या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती, उपाययोजना करून हे आजार आटोक्‍यात आणले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून नारायणगाव आणि वारूळवाडी परिसरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, टायफाईड अशा आजारांनी सर्व नागरिक त्रस्त झाले होते. खाजगी आणि सरकारी दवाखाने या रुग्णांनी “फुल्ल’ झाले होते. यासाठी नारायणगाव-वारूळवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांनी “येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची’ अशी मोहीम राबून जनजागृती सुरु केली होती. नागरिकांनी संसर्गजन्य आजारापासून कशी काळजी घ्यावी, कोणती पथ्ये पाळावीत, साथीचे आजार कसे पसरतात, या साथीची लागण कशी टाळावी, लक्षणे कोणती, त्यासाठी चाचणी कशी करावी, उपचार, रक्ताची तपासणी आदी माहिती असलेली भित्ती पत्रके, फलके, माहिती पत्रिका वाटून जनजागृती केली. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, वारूळवाडीच्या सरपंच जोत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे, ग्रामविकास आधिकारी विद्याधर मुळूक, प्राथामिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी या आजारांचा प्रादुर्भाव होऊन नये यासाठी विषेश मोहीम राबवून सर्वाना आवाहन केले.

  • डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, टायफाईड असे संसर्गजन्य कसे होतात, त्या बाबत घ्यावयाची यासाठी पत्रके वाटून, घंटागाडीमध्ये ध्वननिक्षेपकावरून, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने नागरिकांना जागृत करण्याचे कार्य सुरू आहे. सप्टेंबरमध्ये आरोग्य केंद्रात 200 पेक्षा जास्त रुग्ण रोज येत होते. नव्हेंबर महिन्यात रुग्णाचे प्रमाण 100 च्या आत आले आहे.
    – डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय आधिकारी, नारायणगाव

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)