जनकल्याणच्या स्वेच्छा रक्‍तदान उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर – जागतिक रक्‍तदान दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती संचलित नगरमधील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरास नगर शहरासह परदेशातूनही आलेल्या नागरिकांनी स्वेच्छा रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे, शासकीय कर्मचारी, बॅंक कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांचा या उपक्रमात सहभाग होता. तसेच, जर्मनी येथे नगरचे स्थायिक असलेले अक्षय जाधव यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रा.स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, क्षेत्रीय माहिती व प्रसारण अधिकारी माधव जायभाय, सहायक अधिकारी पी.कणिकुमार, आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, रा.स्व. संघाचे सरसंघचालक शांतीभाई चंदे, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक कुणाल कृष्णमूर्ती, वरिष्ठ अधिकारी विनायक पवळे, डॉ. ओजस जोशी, गणेश अष्टेकर, रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, प्रवीण बजाज, कार्यवाह दिलीप धनेश्‍वर, संचालक प्रमोद सोनटक्के, प्रा. जगताप, डॉ. रूपाली म्हसे, सुनील रुणवाल, आदी उपस्थित होते.

यावेळी रक्तपेढीच्या वतीने स्वेच्छा रक्तदानास आलेल्या सर्व रक्तदात्यांचा विशेष सन्मान केला. तब्बल 86 वेळा रक्तदान करणारे ज्येष्ठ रक्तदाते प्रकाश गांधी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी सुरू झालेला हा स्वेच्छा रक्तदानाचा उपक्रम सायंकाळी उशिरापर्यंत चालू होता. जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये, रक्तसंकलन अधिकारी डॉ. विलास मढीकर, प्रकाश स्मार्त, डॉ. गुप्ता, आदींनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)