जड वाहनांना “नो एण्ट्री : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

देहुरोड – पुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना जड वाहनांना बंदी घातली असताना वर्दळ सुरूच आहे. जिल्हाधिकारी यांच्या जड वाहन प्रवेश बंदीच्या आदेशाला वाहनचालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ,मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी जकात नाका ते देहूरोड सेंटल चौक दरम्यानचे सुमारे 6.3 कि.मी. अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे. लोहमार्ग उड्‌डाणपूल ते गुरुद्वारापर्यंत पाऊण किलोमीटर अंतराचे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी या रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रस्त्याच्या कामामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही ट्रेलर, जड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. रविवारी (दि. 5) रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुंबईकडे जाणारा ट्रेलर रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे तसेच होणाऱ्या अडथळ्याने जुने बॅंक ऑफ इंडिया चौकातील आधार रुग्णालयासमोरील उड्‌डाणपुला खालच्या खांबाला धडकला. खांबाच्या कमानीखाली ट्रेलरचा मागील भाग अडकला होता.

तसेच याच खांबा लगतच्या दुसरा खाबांवर सिमेंट पिलर टाकण्यात येत आहे. काही पिलर टाकण्यात आले आहे. अर्धवट राहिलेले काम मध्यरात्री सुरू असते उर्वरित पिलर टाकण्याचे काम अर्धवट आहे. या बीम अपघातामुळे कोसळण्याची शक्‍यता होती. मात्र अर्धा तास रस्त्यावर हळूहळू वाहतूक कोंडी वाढत होती. घटनास्थळी पोलिसांचे पाचरण झाल्याने वाहतूक नियंत्रण करण्यात आले, तसेच कंटेनरचे मागील चाकांची हवा सोडण्यात आल्याने हळूहळू कंटेनर खांबा खालून काढण्यात आला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या अगोदरही दोन ते तीन अशा किरकोळ स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. मात्र याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित असलेले ठेकेदार यांचे दुर्लक्ष होत आहे. आयुध निर्माणी कारखाना ते गुरुद्वारा दरम्यानच्या उड्डाणपुलालगत असणारे सेवा रस्त्यावर अनेक खड्‌डे झाले असून, साईडपट्ट्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.

स्वीट होम, हॉटेल, बार रेस्टॉरंट, गॅरेज, दुकानांसह पथारीवाले यांच्याकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. एकंदर मार्गावरील वाहतूक व अडथळ्यामुळे दुर्घटना घडत असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत जिल्हाधिकारी यांच्या जडवाहनांना प्रवेश बंदीच्या आदेशानाही केराची टोपली वाहन चालक दाखवत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)