जडेजाला केवळ पाचव्या सामन्यात घेतल्याने बचावलो

इंग्लंडचे सहयोगी प्रशिक्षक फारब्रेस यांची स्पष्टोक्‍ती

लंडन: इंग्लंडच्या दौऱ्यावरील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले नव्हते. पण जेव्हा पाचव्या कसोटीत जडेजाला स्थान देण्यात आले, तेव्हा त्याने आपल्याला वगळणे ही किती मोठी चूक होती, हे दाखवून दिले.

त्यातच इंग्लंडचे सहयोगी प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी जडेजाच्या कामगिरीची प्रशंसा करताना सांगितले की, जडेजा हा अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आहे. पहिल्या चार सामन्यात तो खेळला नाही आणि त्याला भारतीय संघाने केवळ अखेरच्या सामन्यात स्थान दिले याचा आम्हाला आनंद वाटत आहे. किंबहुना जडेजा पाचवी कसोटी सामन्यांत खेळला नसल्यामुळे आम्ही बचावलो, असेच म्हणावे लागेल.

अखेरच्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी विहारी आणि जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तेव्हा भारताची 6 बाद 174 अशी घसरगुंडी झाली होती. मात्र हनुमा विहारी आणि जडेजा या जोडीने सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरलाच, शिवाय इंग्लंडचे डावपेच उधळून लावत भारताचे आव्हान कायम राखले. जडेजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले.

पहिल्या कसोटीत 56 धावांची खेळी करणाऱ्या हनुमा विहारीला बाद करीत मोईन अलीने ही जोडी फोडली. यानंतर दुसऱ्या बाजूला असलेला महंमद शमी पाच चेंडू खेळून माघारी परतला, तेव्हा भारताची 9 बाद 260 अशी स्थिती होती. यानंतर जडेजाने हुशारीने खेळ करून भारताची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 95व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात बुमराह धावबाद झाला. जडेजा-बुमराह जोडीने 32 धावा जोडल्या. अर्थात यात बुमराहचा वाटा शून्य धावांचा होता. जडेजाचे हे इंग्लंडमधील दुसरे, तर एकूण नववे कसोटी अर्धशतक ठरले.

जडेजाने गोलंदाजी करताना इंग्लंडच्या पहिल्या डावात 4 फलंदाजांना बाद केले होते. त्याने दुसऱ्या डावात आतापर्यंत 1 गडी बाद केला आहे. त्यामुळे जडेजाने आपल्याला आतापर्यंत संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. यावेळी फारब्रेस म्हणाले की, जडेजा हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तर आहेच, परंतु त्याचबरोबर तो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. तो केवळ अखेरच्या कसोटी सामन्यात खेळत आहे, हे आमचे भाग्यच आहे. जडेजा पाचही कसोटी सामन्यांत खेळला असता, तर मालिकेचा निकाल कोणत्याही प्रकारे लागण्याची शक्‍यता होती. कारण त्याने पाचव्या सामन्यातील कामगिरीतून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)