“जग्गा…’फ्लॉप झाल्यास रणबीरही देणार वितरकांना भरपाई

चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी वितरकांचे मोठे नुकसान होते. कलाकारांना आणि चित्रपटाशी निगडित इतर व्यक्तींना त्यांचे मानधन मिळते, मात्र फटका वितरकांना बसतो. त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी अगदी क्वचित असे कलाकार वितरकांची भरपाई देण्याचा निर्णय घेतात. याचे हल्लीचे उदाहरण म्हणजे सलमान खानच्या “ट्युबलाइट’ ला बॉक्‍स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वितरकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

कबीर खानच्या या चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर झालेल्या तोट्यामुळे वितरकांची भरपाई करण्यासाठी सलमानने त्याच्या खिशातून 55 कोटी रुपये दिले. सलमानच्या पावलांवर पाऊल ठेवत आता रणबीर कपूरनेही त्याचा आगामी “जग्गा जासूस’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यास वितरकांना भरपाई देण्याचे कबूल केले आहे. “जग्गा जासूस’ रिलीज होऊन 2-4 दिवसच झाले आहेत, पण आतापर्यंतचा बॉक्‍स ऑफिसवरचा अनुभव पाहता सिनेमाला चांगले यश मिळते आहे.

सिनेमातील गाणी आणि कॉमेडी सीनचे ट्रेलरही हिट चालले आहे. आतापर्यंत “जग्गा जासूस’ तब्बल 1150 सिनेमागृहांमध्ये आणि 1800 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याशिवाय विदेशातही 400 ठिकाणी “जग्गा जासूस’ची धूम सुरु आहे. विशेष म्हणजे विश्‍लेषकांनीही “जग्गा जासूस’ला पास केले आहे. त्यामुळे रणबीरला भरपाई द्यायला लागेल असे वाटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)