जगाला मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यामध्ये भारताची सर्वात मोठी भूमिका – देवेंद्र फडणवीस

जोधपूर: जगातील इतर देशांच्या तुलनेत, भविष्यामध्ये भारतातील तरुणाईची संख्या लक्षणीय राहणार असून जगाला मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यामध्ये भारताची सर्वात मोठी भूमिका राहणार आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये ज्ञान, गुणवत्ता, कौशल्य आणि क्षमता उपलब्ध असून त्यांना योग्य संधी व पुरेसे वित्तीय भांडवल मिळाले तर सर्वांना अपेक्षित असा सुजलाम्‌ सुफलाम्‌ भारत साकारलेला दिसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजस्थानातील जोधपूर येथे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन व ग्लोबल एक्‍स्पो होत आहे. या अधिवेशनात प्रमुख उपस्थित म्हणून ते बोलत होते. या अधिवेशनास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुख्य उपस्थितीत माहेश्वरी समाजातील 42 प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आपला देश येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने कूच करतो आहे. अशावेळी त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये, नोकरी मागण्याऐवजी उद्योग-व्यवसाय उभारुन रोजगार देऊ शकणारा माहेश्वरी समाज महत्त्वाचा हातभार लावू शकतो. त्यादृष्टीने अधिवेशनात आयोजित ग्लोबल एक्‍स्पोचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जगाची अर्थव्यवस्था बदलती असून माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सर्वत्र बोलबाला आहे. त्याआधारे एखादी लहानशी स्टार्टअप कंपनी छोट्या कालावधीमध्ये बिलियन डॉलर बिझनेस ग्रुप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून स्टार्ट अपना प्रोत्साहित करणारी इको सिस्टीम प्रयत्नपूर्वक विकसित करण्यात येत आहे.
भारताला विश्वगुरु बनविण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा भारताचा रोडमॅप तयार केला आहे. या मार्गावर सर्वांनी मिळून एकसंघ वाटचाल करणे आवश्‍यक आहे, तरच हे लक्ष्य गाठता येईल, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)