जगाला प्रेम अर्पावे- साध्वी मंजुलज्योतिजी म.सा.

भोसरी – मानव जन्म प्रत्येकास मिळतो, या मानवतेचा स्विकार करून त्याप्रमाणे आचरण करणे प्रत्येक व्यक्‍तीच्या हाती आहे. साधु, संत धर्माचे सद्विचार फक्‍त ऐकण्यासाठी नसतात. तर त्याप्रमाणे आपल्या जीवनात परिवर्तन घडवणारे पाहिजे, नाहीतर सर्व व्यर्थच समजले जाते, असे प्रतिपादन उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातुर्मास प्रवचना दरम्यान केले.

भोसरी येथे सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचना दरम्यान साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. म्हणाल्या की, मानवता हाच खरा धर्म आहे. प्रसिद्ध विचारवंत साने गुरुजी यांनी म्हटल्याप्रमाणे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मन, वचन, काया या तिन्हींचा समन्वय व्हावा, यासाठी सामायिक महत्त्वाची असते. एका चित्ताने केलेली धर्म प्रार्थना ईश्‍वरापर्यंत पोहचते. त्यामुळे सामायिक अमूल्य आहे, असे मार्गदर्शन भगवान महावीर स्वामी यांनी श्रेणिक राजाला केले. श्रेणिक राजाने सुद्धा पैसे, बळ यांचा वापर करून ही सामाईकचे पुण्य खरेदी शक्‍य झाले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चोवीस तीर्थकरांची स्तुती
आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यंच्या जयंती महोत्सवानिमित्त “लोगस्स जप’ चे आयोजन भोसरी जैन स्थानकभुवन येथे करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर यांनी दिली. उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी उपक्रमाची माहिती दिली. साध्वी म्हणाल्या, राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराजांची सर्वांत आवडती ही उपासना होती. चोवीस तीर्थंकरांची स्तुती सांगितली जाते. यामुळे भय, दूर होते तर आत्मिकशक्‍तीचे बळ आपणास प्राप्त होते. साहसी विचार यातून निर्माण होतात. सर्वसाधारणपणे 5,7,11,21,27 याप्रमाणे या तपाची आराधना केली जाते. यासाठी पहाटेचा काळ सर्वोत्तम काळ असतो व सायंकाळी ही तप केले जाते. यासाठी साध्वी वसुधाजी म.सा. यांच्याकडे नाव नोंदणी आहे. तपस्वी हर्षल बांठिया यांच्या आठ उपवासानिमित्त श्री संघातर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्काराचा मान नमीना बाबेल, राजेंद्र बांठिया, प्रविण गुंदेचा यांना मिळाला. कवी नंदकुमार लुंकड यांनी गुरु आनंद सादर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)