जगातील सर्वात मोठे घुमट उभारणाऱ्यांचा होणार गौरव

आळंदी येथे उद्या रंगणार सोहळा

लोणी काळभोर- येथील एमआयटी परिसरात संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नावाने जगातील सर्वात मोठा घुमट उभारणाऱ्या कारागिरांचा सत्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आळंदी येथे संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त कार्तिकी एकादशी सोमवारी (दि. 3) होणार आहे. यावेळी सदर कारागिरांना समर्पित सेवा जीवन गौरव पुरस्कारानेही लाखो वारकरी भाविकभक्तांच्या साक्षीने गौरविण्यात येणार आहे.
लोणीकाळभोर येथे एमआयटीच्या परिसरात सुंदर व देखण्या वास्तूची संकल्पना, नियोजन वास्तुरचना व निर्मिती ही ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांची आहे. गेल्या सुमारे 12 वर्षाहून अधिक काळ, अत्यंत समर्पित भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने व कर्तव्यबुद्धीने त्याचबरोबर, एवढ्या मोठ्या घुमटासाठी क्रेनसारख्या आधुनिक यांत्रिक उपकरणांच्या वापराविना, ज्यांनी प्रत्यक्ष काम केले, अशा खेड्यापाड्यातून आलेल्या सामान्य कामगार, कारागिरांचा सन्मान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आणि ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसन महाराज साखरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्‍वशांती ग्रंथालयाचे बांधकाम करण्यामध्ये गोविंद अलेटी, विष्णू भिसे, छगनलाल सुतार, मिठ्ठनलाल मालवीय, कृष्णा पवार, दिलीप पाटील, शिवाजी गोरे, राजाराम घुगे, श्रीनिवास मंगळुरी, विकास तांबट आणि दिलीप रोहम या कारागिरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा कुशल कारागिरांचा श्रीक्षेत्र आळंदी येथील विश्‍वरूप दर्शन मंचावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्‍वर माऊली सेवा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)