जगातील सर्वांत लांब झुलता पूल

जीनिवा : जगात अनेक प्रकारचे अद्वितीय आणि आकर्षक पूल बांधण्यात आले आहेत. अनेक प्रकारच्या पुलांपैकी एक म्हणजे ‘झुलता पूल’ होय. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमधील हिमाच्छादित पर्वतीय भागात बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाची सध्या चर्चा आहे. हवेत चालणे आणि धावणे, अशी दोन्ही स्वप्ने पूर्ण करणारा हा झुलता पूल आहे. “ग्रेबेनगुफर’ नदीवर सुमारे 85 मीटर उंचावर बांधण्यात आलेल्या या झुलत्या पुलाचे नाव “युरोपाब्रूक’ असे आहे.

समुद्र सपाटीपासून सुमारे 14 हजार 911 फूट उंच असलेल्या व स्वित्झर्लंडमधील सर्वात उंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “हाय डोम’ या पर्वतीय भागातील “ग्रेबनफुगर’ नदीवर हा झुलता पूल आहे. सुमारे 1620 फूट लांब आणि 278 फूट उंच असलेला हा “हाय सस्पेन्शन ब्रिज’ जगातील सर्वात लांब पूल असल्याचे म्हटले जात आहे.

स्वित्झर्लंडमधील रॅंडा या भागातील झेरमॅट्ट आणि ग्रॅईचेन या पर्वतीय खेड्यांना हा पूल जोडतो. झेरमॅट्ट पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार या अद्‌भुत झुलत्या पुलासाठी आठ टन वजनाच्या तारेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हवेत असूनही तो वाऱ्याच्या प्रचंड झोताने हलत नसल्याने त्यावरून चालणे अत्यंत सुलभ बनते. आजपर्यंत ऑस्ट्रियातील रूएटमध्ये 110 मीटर उंच आणि 405 मीटर लांबीच्या पुलाला जगातील सर्वात लांब झुलता पूल म्हणून ओळखण्यात येते होते. मात्र, युरोपाब्रूकने या पुलाला आता मागे टाकले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)