जगातील पहिल्या ५०० श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये अब्जावधीची घट

नवी दिल्ली : जगातील पहिल्या ५०० श्रीमंतांना मागचे दोन महिने वाईट गेल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक आघाडीवर त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा त्यांना जबर फटका बसला आहे. या आठवड्यात ५०० श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये १८१ अब्ज डॉलर्स म्हणजे ११,७६७ अब्ज रुपयांची घट झाली आहे.

स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे ट्रेड वॉर सुरु होण्याची भिती असल्याने अमेरिकी शेअर बाजाराने दोनवर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. या महाश्रीमंतांच्या संपत्तीत २६ जानेवारीपासून ४३६ अब्ज डॉलर म्हणजे २८,३४५ अब्ज रुपयांची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून त्याची संपत्ती १०.३ अब्ज डॉलर म्हणजे ६७० अब्ज रुपयांनी कमी झाली आहे. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणाचा फटका फेसबूकला बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)