जगातील निम्मे कुष्ठरोगी भारतात आढळतात ; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

नवी दिल्ली: दरवर्षी जगात दोन लाख कुष्ठरोगी आढळून येतात पण त्यातील निम्म्याहून अधिक रूग्ण भारतात आढळून येतात अशी माहिती जागतिक आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपालसिंग यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की कुष्ठरोगाच्या संबंधात भारताने दोन महत्वाच्या कायदेशीर तरतूदी केल्या आहेत. त्यानुसार कुष्ठरोग्यांना भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे आणि कुष्ठरोग असणे हे घटस्फोटासाठीचे वैध कारण मानण्याची तरतूदही भारताने केली आहे.

भारताबरोबरच ब्राझील, अफ्रिकेचा सहाराचा प्रदेश या ठिकाणी कुष्ठरोगी आढळून येतात. कुष्ठरोगाविषयी अजूनही खूप गैरसमज आहेत असे सांगून त्या म्हणाल्या की वेळीच या रोगाची कल्पना आली तर तो पुर्णपणे बराही होऊ शकतो हे अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही. या रोगाविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज आता निर्माण झाली आहे असेही त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. सारे जग कुष्ठरोग मुक्त असावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे व्यापक प्रयत्न जगभर केले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)