जगातील एकमेव शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू

 केनिया : जगातील एकमेव शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात या गेंड्याचा मृत्यू झाला आहे. सुदान असे या गेंड्याचे नाव होते. सुदान 45 वर्षांचा होता.

2009 साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणले होते. जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर गेंडा होता. ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

Humans-weapons of mass destruction ?

Posted by Lex Austen on Tuesday, 20 March 2018

सुदानच्या संरक्षणासाठी तसेच त्याला तस्करांपासून वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान, सुदानचे  वय वाढले होते, तो वृद्ध झाला होता. तसेच त्याच्या पायातली ताकदही हळूहळू कमी होत गेली होती. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला त्रास होत होता. त्याच्यासोबत दोन माद्या सध्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले मात्र त्यांना फारसे यश आले नसल्याचे अभयारण्य अधिकाऱ्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)