पुरूषांचे प्रमाण 24 टक्के
नवी दिल्ली – जगात महिलांच्या ज्या एकूण आत्महत्या होतात त्यापैकी 37 टक्के आत्महत्या भारतात होतात आणि पुरूषांच्या आत्महत्यांचे भारतातील प्रमाण हे 24 टक्के आहे अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या पहाणीत आढळून आली आहे. या संस्थेने 1990 ते 2016 या अवधीतली ही जगभरातील आत्महत्यांची आकडेवारी संकलीत केली आहे त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी 15 ते 39 वयोगटातील लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण 63 टक्के इतके आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.

1990 पासून 2016 पर्यंत जगभरातील आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण 40 टक्के इतके वाढले आहे. सन 2016 साली एकूण 2 लाख 30 हजार 314 जणांनी आत्महत्या केली. भारतात कर्नाटक, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतील आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांत महिला आणि पुरूषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे तथापी केरळ आणि छत्तीसगड या राज्यांत पुरूषांच्या आत्महत्यांचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे.

सन 2016 सालच्या आकडेवारीनुसार भारतातील महिलांच्या आत्महत्यांनी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण (डेथ रेट) प्रति एक लाख महिलांमध्ये 15 टक्के इतके आहे. जागतिक स्तरावर हेच प्रमाण 7 टक्के इतके आहे. महिलांच्या एकूण आत्महत्यांपैकी भारतात विवाहित महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.

भारतातील पुरूषांच्या आत्महत्यांमध्ये युवा वर्गातील आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. अलिकडच्या काळात भारतात 80 वर्षांवरील पुरूषांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढते असून ही एक नवीन चिंतेची बाब ठरली आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)