जगाच्या बाजारात टिकण्यासाठी मेहनतीची सवय लावा

 प्रा. पवन पाटील यांचे ग्लोबल एक्‍स्पोच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

उंब्रज – जगाच्या बाजारात टिकायचे असेल तर मेहनतीची सवय लावून घ्या. त्याबरोबरच भरपूर खेळा, काम करा पायाला माती लागली तर लागुद्या पण मनाला माती लागू देऊ नका. कारण पायाला लागणारी माती पुसता येते पण मनाला लागलेली माती आयुष्याची माती करेल, असे प्रतिपादन भोगावती कॉलेजचे प्रा. पवन पाटील यांनी केले.
उंब्रज ता. कराड येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित ग्लोबल नॉलेज एक्‍स्पोमधील व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान याविषयावर प्रा. पवन पाटील बोलत होते. यावेळी ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन महेशकुमार जाधव, संचालक दिलीपराव जाधव, सूर्यकांत जाधव, सचिव रवींद्र यादव, प्राचार्य गणेश देशमुख, प्रा. अभिषेककुमार गुप्ता उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रा. पवन पाटील म्हणाले, आयुष्यात शिक्षण ही तारेवरची कसरत आहे. विद्यार्थी हा तारेवर पुस्तकरुपी काठी घेऊन चालत आहे. तो व्यवस्थित चालावा असे वाटत असेल तर ढोल वाजवणारा बाप पाहिजे. ढोलाचा ठोका चुकला तर पुढची सर्व गणिते चुकतील. बापाचा धाक व आईची माया असणारे शिक्षक असणे खूप गरजेचे असते. घरात अथवा शाळेत वाईट शिकवत नाहीत मग या वाईट सवयी मुलांना लागतात तरी कुठून याबाबत शिक्षकांबरोबरच पालकांनी दक्ष राहिले पाहिजे. स्वप्ने मोठी असली तरच आयुष्यात काहीतरी करुन दाखवता येते म्हणूनच लक्ष मोठे ठेवा असा सल्लाही प्रा. पवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी प्रा. अभिषेककुमार गुप्ता यांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)