जगभरातील 1 लाख लोक बेपत्ता !

त्यांचा शोध ही एक जागतिक समस्या – रेडक्रॉस 

संयुक्तराष्ट्रे: जगभरातील एक लाखाहून अधिक लोक बेपत्ता असल्याची आमच्याकडे नोंदवली गेलेली माहिती आहे त्यांचा शोध ही एक जागतिक समस्या आहे असे रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे. या संघटनेच्या एक पदाधिकारी एजन्स कोैतोअु यांनी संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार समितीपुढे बोलताना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की आमच्याकडे आलेली ही आत्तापर्यंतची बेपत्ता लोकांची सर्वात मोठी संख्या आहे. जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे संघर्ष सुरू आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात मनुष्य हानीही होत आहे. आमच्याकडे हे एक लाख लोक बेपत्ता असल्याची माहिती असली तरी प्रत्यक्षात बेपत्ता असलेल्यांची संख्या याही पेक्षा खूप अधिक असु शकेल असे त्या म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बेपत्ता लोकांच्या शोध कार्याविषयी रेडक्रॉस संघटना 40 देशांमध्ये विविध ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीने काम करीत आहे असे त्या म्हणाल्या. संघर्ष आणि युद्धजन्य स्थितीमुळे अनेक लोकांना आपल्या घरापासून परागंद व्हावे लागले आहे. गेल्या अनेक दशकांपासून माणसे बेपत्ता होण्याचे प्रकार सुरू आहेत. ही एक भंयकर जागतिक समस्या आहे. या बेपत्ता माणसांचे पुढे नेमके काय होते हेही जगाला समजायला मार्ग नाही असे त्या म्हणाल्या. संघर्ष आणि युद्धजन्य स्थितीमुळे अनेक लोकाना विस्थापित व्हावे लागते. यापैकी अनेक लोकांचा नंतर पत्ताच लागत नाही अशी स्थिती आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

यातील अनेकजण कारागृहातही खितपत पडलेले असतात पण त्यांचे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्कच होऊ शकत नाहींत. त्यांना नेमके शोधायचे तरी कोठे असा प्रश्‍न हजारो कुटुंबांना पडलेला आहे असे आम्हाला ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. अशा बेपत्ता लोकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटवण्याच्या प्रयत्नात संयुक्तराष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)