जगभरातील हिंदुंच्या हक्‍कासाठी कायम स्वरूपी सचिवालय नेमणार

वर्ल्ड हिंदु कॉंग्रेस मध्ये ठराव

शिकागो: जगभरातील हिंदुंच्या हक्कांवर आवाज उठवण्यासाठी कायम स्वरूपी सचिवालय स्थापन करण्याचा निर्णय येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड हिंदु कॉंग्रेस मध्ये घेण्यात आला आहे. हिंदु हा विधायक बदल घडवणारा आहे हे जगाला ठळकपणे दाखवून देण्यासाठी हिंदुंनी कार्यरत राहावे असे आवाहनही यानिमीत्ताने करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या 125 व्या वर्षपुर्ती निमीत्त शिकागो येथे ही हिंदु कॉंग्रेस आयोजित करण्यात आली होती त्याला जगभरातील सुमारे 2500 प्रतिनिधी निमंत्रीत करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनाचा काल समारोप झाला. त्यात 60 देशांतील 250 वक्‍त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

हिंदुंचे विधायक कार्य लोकांपर्यंत ठळकपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कायम स्वरूपी सचिवालय नेमले जाणार आहे ते अमेरिका किंवा ब्रिटन मध्ये उभारले जाणार आहे अशी माहिती या अधिवेशनाचे संयोजक अभय अस्थाना यांनी दिली. या विषयावर या आधिवेशनात एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की हिंदुंचा एक जागतिक पॉलिटकल फोर्स निर्माण करण्याची गरजही या अधिवेशनात व्यक्त झाली आहे. त्यातून नवे हिंदु नेतृत्व पुढे यावे आणि या नेतृत्वाला सर्वचदृष्टीने विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या सचिवालयातर्फे मदत केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.

कॅरेबियन देश, फिजी आणि अफ्रिकन देशांमध्ये असा हिंदुंचा पॉलिटकल फोर्स निर्माण करण्याचा आमचा इरादा आहे असे ते म्हणाले. जगभरातील हिंदुंच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी युवापिढीने सोशल मिडीयाचा वापर सातत्याने करून या प्रकारांच्या विरोधात संघटतीपणे आवाज उठवावा आणि जागतिक समुदायाचे लक्ष वेधावे अशी सुचनाही यावेळी करण्यात आली ती मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)