जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचा स्रोत एकच देश – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

सिंगापूर – जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचा स्रोत एकच आहे, साऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान एकच आहे असे सूचित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताकडे इशारा केला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याशी झालेल्या चर्चेत हा विषय आल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे.

सिंगापूरमधील ईस्ट एशिया शिखर परिषदेच्या वेळी मोदी आणि पेन्स यांनी अनेक द्विपक्षीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करताना पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांतील दहशतवाद्यांच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली. जगभरात होत असलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याचे उघड झालेले आहे. दोन डिसेंबर 2015 रोजी कॅलिफोर्नियातील सॅन बर्नांडिनो येथे अंदाधुंद गोळीबार करून 14 बळी घेणारा पाकिस्तानी होता.

-Ads-

जून 17 रोजी लंडनमध्ये चाकूहल्ला करणाऱ्या तिघातील एक पाकिस्तानी होता, या हल्ल्यात 7 ठार आणि 49 जण जखमी झाले होते. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत दोन्ही देश दहशतवादाविरुद्ध लढण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)