जगप्रसिद्ध पॅसिफिक महासागरदेखील झालाय कचराकुंडी

पॅरिस :  सध्या जगभरात कचऱ्याच्या समस्येने तोंड वर काढले आहे. हा जमा झालेला कचरा कोठे टाकावा, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भारतातील अनेक नद्या कचराकुंडी झाल्या आहेत. तर काही समुद्रकिनारे देखील यातून सुटलेले नाहीत. आता पॅसिफिक समुद्राला देखील या समस्येने ग्रासले आहे.

पॅसिफिक महासागरदेखील कचराकुंडी झाली असून फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या तीन देशांत मावेल इतका प्लास्टिक कचरा या समुद्रात साठल्याचे समोर आले आहे. नेमका किती प्लास्टिक कचरा या समुद्रात असेल, याचा अंदाज नेदरलँडच्या काही संशोधकांनी बोट आणि विमानांच्या मदतीने घेतला. यात सुमारे 80 हजार टन कचरा असल्याचा अंदाज आहे.  यापूर्वी करण्यात आलेल्या पाहणीपेक्षाही कचर्‍याचे समुद्रात दरवर्षी ८ दशलक्ष टन इतका प्लास्टिक कचरा फेकला जातो, असे संशोधकांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)