जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पतसंस्थेचे वाकसई येथे उद्‌घाटन

कार्ला  – शेतकरी, कष्टकरी महिला, बेरोजगार युवक यांची होत असलेली विविध व्यवसायासाठी लागणारे भांडवल मिळवण्या करता लागणारी धावपळ लक्षात घेऊन वाकसई येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था नव्यानेच सुरू केली आहे. त्याचे उद्‌घाटन जिल्हा परिषेद सदस्या कुसूमताई काशिकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे, सदस्या राजश्री राऊत, पंचायत समितीचे सदस्य दिपक हुलावळे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संत तुकाराम पादुकास्थान अध्यक्ष भरतभाऊ येवले संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब येवले, व्हाईस चेअरमन राजु देवकर, सरंपच दिपक काशिकर, उपसरपंच मनोज जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले.

वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, कार्ला, वेहरगाव, शिलाटणा, दहिवली, वरसोली, भाजे, देवले, सदापूर, पाटण या भागातील प्रमुख मान्यवर एकत्र येत ही पतसंस्था सुरू केली आहे.
भविष्यात या पतसंस्थेद्वारे परिसरातील युवकांना, महिलांना, कष्टकऱ्यांना छोटे-मोठे लघु उद्योग सुरू करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीच्या विकासासाठी संस्थेद्वारे कर्ज पुरवठा तसेच वीज बिल भरणा केंद्र सुरू केले जाणार असल्याचे दिपक हुलावळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी संस्थेचे संस्थापक अमोल केदारी, किरण हुलावळे संचालक मारुती देशमूख, मनोज जगताप, सुरेश कडू, रघूनाथ मराठे, गणपत भानुसघरे, लक्ष्मण शेलार, संतोष राऊत, गणपत विकारी, विकास खांडेभरड, वाकसई देवघर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, गणेश देशमुख, ज्ञानेश्‍वर काशिकर, सदस्या पुनम येवले, निलम शेलार, वरसोली सदस्या रजनी कुटे एकविरा देवस्थानचे नवनाथ देशमुख शंकराव शिर्के, किसन आहेर, सदाशिव आहेर, निवृती देशमुख, विठ्ठल वाघमारे, सोनाली, फाटक, शाम विकारी अमोल शेलार, प्रवीण येवले, भरत साठे, हनुमंत आहेर, विलास खांडेभराड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अमोल केदारी यांनी केले. सूत्रसंचालन किरण हुलावळे यांनी केले. बाळासाहेब येवले यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)