पुणे – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय 34, रा जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय 30, रा जयभवानीनगर, कोथररूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, रा मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय 36) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा शांतीनगर, येरवडा), नाना कुदळे (रा केळेवाडी) आणि अजय कंधारे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे.

बिल्डर सुधीर कर्नाटकी यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला आहे. या प्रकरणात माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर (रा. कमलसुधा अपार्टमेंट, नारायण पेठ) यांनाही अटक झाली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी दि.2 जून रोजी घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात सहा जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)