जगतापांविरोधात डॉ. विखेंची टोमणेबाजी

सिद्धार्थनगरमध्ये मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

नगर –
“मतासांठी लाचारी पत्करणारा माणूस नाही. घाबरून घरी बसणाऱ्यांपैकी नाहीच नाही. एका रात्रीत सेटिंग करण्याचे घाणेरडे राजकारण करण्याचा स्वभाव नाही,’ असा टोमणा कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे मित्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा नामोल्लेख करत लगावला. जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल फाउंडेशनतर्फे नगरमधील सिद्धार्थनगरमध्ये आयोजित केलेल्या सर्व रोगनिदान मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते.

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बाजी मारली. या अजब युतीची राज्यासह देशात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या त्रासामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचे खुलाशात म्हटले आहे. केडगाव हत्याकांडानंतर आमदार जगताप बरेच दिवस घराबाहेर नव्हते. हाच धागा पकडत डॉ. विखे पाटील यांनी आमदार जगताप यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टोलेबाजी केली. या टोलेबाजीची कार्यक्रमानंतर नगर शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. विखे म्हणाले, “लोकसभेसाठी माझी तयारी सुरू आहे. त्यासाठी ही जनसेवा आहे, असे अनेकजण म्हणतात. लोकसभेत पराभव झाला, तरी फाउंडेशनच्या माध्यमातून ही जनसेवा सुरूच राहणार आहे. माझी डॉक्‍टरची प्रतिमा खराब करायची नाही. राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापरही करणार नाही.’ मी कोणालाही घाबरत नाही. घाबरून घरी बसणाऱ्यांपैकी देखील नाही. सत्तेसाठी रात्रीतू सेटिंग करणाऱ्यांपैकी तर बिलकूलच नाही.

शहरातील विकासकामांवर बोलताना महापौरांनी काय दिवे लावले आहेत, त्यावर योग्यवेळी बोलेल, असेही ते म्हणाले. सुनील कोतकर दुरावले होते. ते पुन्हा पक्षात आले आहेत. पक्षापेक्षा माणसं महत्त्वाची असतात. सचिन जाधव, मुदस्सर शेख यांचा पक्ष वेगळा असला, तरी त्यांचा स्वभाव चांगला आहे. विचार वेगळे आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, धनंजय जाधव, बसपच्या नगरसेविका सुप्रिया जाधव, मुदस्सर शेख, महिला शहरजिल्हाध्यक्षा सविता मोरे, माजी नगरसेवक सुनील कोतकर, सचिन जाधव, डॉ. एस. एस. दीपक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)